Kolhapur Rickshaw Driver Murder
कोल्हापूर : शहरातील हनुमान नगर पाचगाव रोड परिसरात आज (दि.४) सकाळी भीषण खुनाची घटना उघडकीस आली आहे. रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत व अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत रिक्षाचालकाचे नाव मोहन पोवार असे असून त्याच्या खुनामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा सुरू केला आहे. गुन्हे शाखेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास सुरू आहे.
दरम्यान, खुन्याचा मागोवा घेण्यासाठी घटनास्थळाजवळील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. प्राथमिक चौकशीतून काही ठोस धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण घटनेमुळे पाचगाव रोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, रिक्षाचालक व स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.