कोल्हापूर

कोल्हापूर : झाड अंगावर पडल्याने राधानगरी तालुक्यातील एकाचा मृत्यू

backup backup

कौलव, पुढारी वृत्तसेवा : बरगेवाडी (ता.राधानगरी) येथे झाड अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. दौलू मसू लोहार (रा. कौलव,  वय ६८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीपती गणू पाटील बेलेकर( रा बरगेवाडी) हे गंभीर जखमी झाले. या दुर्दैवी घटनेबद्दल परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झालेली आहे.

अधिकची माहिती अशी की, आज (दि.१५) शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास लोहार हे आपल्या सोबत काही जणांना घेऊन झाड तोडून आणण्यासाठी गेलेले होते. दौलत लोहार हे व्यवसायाने सुतार काम करत असत घराला लागणारे बडोदे,दरवाजे ते तयार करून देत असत. या कामासाठी म्हणून त्यांनी बरगेवाडी येथील तीन झाडे विकत घेतलेली होती. ती तोडून झाल्यानंतर त्या झाडाला दोर बांधून ओढून खाली पाडले जात होते. त्यामध्ये स्वतः दौलत लोहार हे ओढत असताना अचानक झाड थेट लोहार यांच्या अंगावर आले.त्यात लोहार यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, श्रीपती पाटील हे पळून दूर जात असताना पडल्याने त्यांचा एक पाय निकामी झाला आहे. लोहार यांची घरची परिस्थिती अतिशय गरीबीची व बेताची असल्याने चरितार्थासाठी ते लाकूडतोडी चा व सुतार कामाचा व्यवसाय करत होते. मात्र, लाकूड तोडीवेळीच त्यांचा दुर्देवी मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT