Kolhapur news 
कोल्हापूर

Kolhapur news: श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थान पूरग्रस्तांसाठी सरसावले; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखांची मदत

Nrusinhasaraswati Swami Datt Devsthan donation news: मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देवस्थान समितीने हा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपये सुपूर्द करण्यात आले. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी मदतीचा धनादेश स्वीकारला.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी म्हणाले, "महापुरामुळे मराठवाड्यातील जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून दत्त देवस्थानने नेहमी मदत केली आहे. याद्वारे भक्तांच्या देणगीचा योग्य व सत्कार्यासाठी उपयोग करत असल्याचे त्यांनी नमूद केले. आ. यड्रावकर म्हणाले, महापुराचा प्रत्यक्ष अनुभव तालुक्यातील जनतेला आहे. यामुळे पूरग्रस्त बांधवांसाठी आपण सर्वात आधी मदत केली असल्याचे सांगत त्यांनी दत्त देवस्थानचे आभार व्यक्त केले. यावेळी दत्त देवस्थानचे सचिव गजानन गेंडे-पुजारी, विश्वस्त संतोष खोंबारे, संजय उर्फ सोनू पुजारी, विपुल हावळे, संजय पुजारी, महेश पुजारी, योगेश घाटे-पुजारी, श्रीवल्लभ जेरे पुजारी आदी उपस्थित होते. चंद्रशेखर विभुते यांनी आभार मानले.

कन्यागत महापर्वकाळासंबंधी सूचना

दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी देवस्थानच्या काही समस्यांचे निराकरण करण्यांसंबंधी आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे आग्रही मागणी केली. यावर त्यांनी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना सूचना केल्या. २०२८ साली होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळासाठी १००० कोटी निधीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातून नृसिंहवाडीसह शिरोळ तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत दत्त देवस्थान व ग्रामपंचायतीच्या संयुक्त बैठकीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT