गांधीनगर; पुढारी वृत्तसेवा: ग्रामपंचायतच्या निवडणुकीत चिंचवाड (ता. करवीर) येथे उमेदवाराच्या प्रतिनिधीस मतदान केंद्रात सोडण्यावरून काही काळ गोंधळ व वादावादी झाली. मात्र पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे वातावरण शांत होऊन पूर्व पदावर आले. मात्र काही काळ तणाव राहिला.
मतदारांना ने- आण करण्यावरूनही उमेदवारांच्या प्रतिनिधीमध्ये वादावादी झाली. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मतदान शांततेत सुरू झाले. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील गट व महाडिक घटाने एक पॅनल केले आहे. तर या दोन्ही मधील नाराज उमेदवारांनी अपक्ष पॅनल उभे केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत वेगळीच चुरस व रंगत आली आहे.