कोल्हापूर

कोल्‍हापूर : वाघापुरात नागपंचमी यात्रा उत्‍साहात संपन्न

निलेश पोतदार

मुदाळतिट्टा : प्रा.शाम पाटील ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत नागराजाला लाह्यांचा नैवेद्य अर्पण करीत महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमीची यात्रा उत्‍साही वातावरणात संपन्न झाली. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थितीती लावली. पावसाची उघडीप राहील्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली. उत्कृष्ट नियोजनामुळे भाविकांत समाधानाचे वातावरण दिसत होते.

पहाटे पाच वाजता आमदार प्रकाश आबीटकर व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी आबीटकर यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा संपन्न झाली. त्यानंतर महाआरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यानंतर सहवाद्य मिरवणुकीत आणलेल्या कुंभांर समाजातील नागमूर्ती देवालयात अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्या मुर्तीची ही विधीवत पूजा करण्यात आली.

जोतिर्लिग च्या नावाने चांगभलं चा जयघोष करीत भक्तानी दर्शन घेतले. महिलांनी लाह्या वाहत नाग देवतेची गाणी गायली. आणि जणु गौरीगणपतीच्या सणाची चाहूल लागल्याचे पहायला मिळाले. यात्रा काळात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाघापूर, आदमापूर, मुदाळतिट्टा, कुर अशी एकेरी वाहतूक सूरु होती. गारगोटीसह अनेक आगारातून ज्यादा बस सोडण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग प्रशासन, देवस्थान समिती, ग्रामस्थ यांनी योग्य सेवाभाव जोपासला होता. ठिकठिकाणी अन्नछत्र उभारून भाविकांना अन्नदान करण्यात येत होते. त्यामुळे यात्रा सुरळीत पार पडली. पहाटे पासून दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT