अजित दिवटे  Pudahri
कोल्हापूर

Kolhapur Teacher Suspended | विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षक अजित दिवटेला निलंबित करण्याचे आदेश

विनयभंग प्रकरणी शिस्तभंग कारवाईसह चौकशी समिती गठीत करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Kurundwad Student Molestation Case Teacher Suspended

कुरुंदवाड : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सहाय्यक शिक्षक अजित भूपाल दिवटे याला तत्काळ सेवेतून निलंबित करून शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षण संस्थेला दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नि चौकशी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांची सुरक्षा, हित व शाळेतील शैक्षणिक वातावरणाची शुचिता लक्षात घेता ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे शिक्षण विभागाने नमूद करत महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ नुसार दिवटे यांना तत्काळ निलंबित करून शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित शिक्षकाचे अध्यापन व इतर कामकाज इतर शिक्षकांकडे सोपविण्याचे निर्देशही संस्थेला देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षण संस्था आता काय कारवाई करणार याकडे पीडीत विद्यार्थीनीच्या गावच्या ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT