Electric Shock  (file photo)
कोल्हापूर

Kolhapur Accident | कवठेगुलंद येथे रस्त्यावर तुटलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का; दुचाकीवरून पडून आई-मुलगा गंभीर जखमी

विद्युत वाहिनीची नियमित तपासणी करून धोकादायक तारा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Kavathe Guland Electric Wire Shock

कवठेगुलंद : कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथे शेताकडे मोटरसायकलवरून जात असलेल्या आई व मुलाला महावितरणच्या विद्युत तारांचा शॉक लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.२) सकाळी घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवतेज जगताप व त्यांची आई रंजना जगताप हे दोघे सकाळच्या सुमारास मोटरसायकलवरून आपल्या शेताकडे जात होते. यावेळी महावितरणची विद्युत तार तुटून रस्त्यावर खाली आलेली होती. मोटरसायकलवरून जात असताना या विद्युत तारांचा त्यांना स्पर्श झाल्याचे समजते.

विद्युत तारांचा स्पर्श होताच दोघांनाही जोरदार विजेचा धक्का बसला. यामुळे मोटरसायकलवरील दोघेही खाली पडले. या घटनेत शिवतेज व रंजना जगताप गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, रस्त्यावर विद्युत तार तुटून पडलेली असतानाही त्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आली नसल्याचा आरोप करत घटनास्थळी नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. विद्युत तारांची नियमित तपासणी करून धोकादायक स्थितीतील तारा तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT