करवीर तालुक्यात बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना  (Pudhari Photo)
कोल्हापूर

Kolhapur Crime | कोल्हापूर हादरले! बापलेकीच्या नात्याला काळीमा; १३ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्याचा अत्याचार, नराधमाला अटक

Kolhapur Abuse Case | करवीर तालुक्यातील संतापजनक घटना

पुढारी वृत्तसेवा

Karveer minor girl abuse case

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघड केला आहे. करवीर पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. माणुसकीला कायम फासणारी घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महिला संघटनासह सामाजिक संस्थांनी केली आहे.

पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले की, नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि दोन लहान मुले कोल्हापूर येथील एका उपनगरात वास्तव्याला होते. मुलीची आई भंगार गोळा करून मुलांचा सांभाळ करीत होती. मात्र, दिवाळी तोंडावर असल्याचे कारण पुढे करून नराधामाने तेरा वर्षांच्या मुलीला गावी नेले.

दरम्यान, शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी साडेसात वाजता आणि बुधवारी (दि.22) पहाटे नरारामाने धारदार शस्त्राचा धाक दाखवून स्वतःच्या तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही माथेफिरूने पीडित मुलीला दिली. मुलीने हा प्रकार आईला सांगतात त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. सामाजिक संस्थांनीही या प्रकाराचा निषेध व्यक्त करून अल्पवयीन मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी केली आहे.

या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
- किशोर शिंदे, पोलीस निरीक्षक, करवीर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT