कोल्हापूर

कोल्हापूर : राशिवडे येथे घराला लागलेल्या आगीत प्रापंचिक साहित्य जळून खाक

अविनाश सुतार

राशिवडे : पुढारी वृतसेवा : येथील मनोज मोहन वाडकर यांच्या राहत्या घरास आज (दि.३) सकाळी शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. यात प्रापंचिक साहित्यासह शेती औजारे, धान्य, कपडे आदीचे सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, घरामध्ये वाडकर कुटुंब वास्तव्यास आहे. दुभती जनावरे, चारा, वैरण, शेती औजारे या आगीत भस्मसात झाली. सुदैवाने प्राणहानी टळली. आग लागल्याचे समजताच नागरिकांनी जनावरांना बाहेर काढले. भोगावती कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या बंबानी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत सर्वकाही आगीत भस्मसात झाले होते. या घटनेचा पंचनामा तलाठी शहाजी चिंदगे, पोलीस पाटील उत्तम पाटील यांनी केला.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT