कळे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. Pudhari News Network
कोल्हापूर

कोल्हापूर : कळे परिसरात मुसळधार; कुंभी-धामणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

पुढारी वृत्तसेवा

कळे : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. कळे परिसरासह धामणी खोऱ्यामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धामणी नदीच्या पाणी पातळीत झापाट्याने वाढ झाली आहे. तसेच कुंभी नदीवरील गोठे (ता.पन्हाळा) येथील पूल रविवारी (ता.२१) दुपारी तिसऱ्यांदा पाण्याखाली गेल्यामुळे येथून धुंदवडेकडे (ता.गगनबावडा) होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

रविवारी दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कुंभी नदीवरील कळे-सावर्डे, धामणी नदीवरील सुळे-आकुर्डे व अंबर्डे हे बंधारे दुपारी पाण्याखाली गेले. दरम्यान धामणी नदीवरील गवशी (ता.राधानगरी) याही बंधाऱ्यावरही आज (रविवारी) दुपारच्या सुमारास पुराचे पाणी आल्याने या मार्गावरुन होणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

SCROLL FOR NEXT