स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली  
कोल्हापूर

Sugarcane Protest | हालोंडी येथे जवाहर कारखान्याकडे ऊस घेवून निघालेला ट्रॅक्टर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखला

घटनास्थळी कारखाना संचालकांची भेट : दर निश्चित होत नाही तोवर ऊसतोड थांबविण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

शिरोली : जवाहर साखर कारखान्याकडे ऊस घेवून निघालेला ट्रॅक्टर ट्रॉली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हालोंडी येथे अडवून धरला , घटनास्थळी कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यानी दर निश्चित होत नाही तोवर ऊसतोडणी थाबवू असे आश्वासन दिले .

हालोंडी ता हातकणंगले येथे आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हेरले येथून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर टाॅली वाटेत आडवून चालकाकडे ऊस तोडणीबाबत माहिती विचारली असता त्याने हा ऊस हेरले येथून भरून हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याला घेवून जात असल्याचे सांगितले त्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांना फोनद्वारे ऊस घेवून जाणारा ट्रॅक्टर ट्राँली आडवला असल्याचे सांगताच पाटील हे घटनास्थळी आले व त्यांनी जोपर्यंत दराचा निर्णय होत नाही तोवर ऊस तोडणी थांबवतो असे आश्वासन देत हा आडवलेला ट्रॅक्टर टाॅली सोडा अशी विनंती केल्यावर ट्रॅक्टर टाॅली सोडण्यात आली .

यावेळी कारखान्याचा कर्मचारी संचालक आदगोंडा पाटील व संघटनेचे कार्यकर्ते यांचे संभाषणाचा व्हिडीओ शुट करत असताना आकिवाटचे सरपंच विशाल चौगुले यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी व्हिडिओ शूट करणाऱ्यावर संतत्प होत आम्ही कुणाला घाबरत नाही , आम्ही झाकून काय करत नाही, ट्रॅक्टर अडवल्यावर तुम्ही इतकी तत्परता दाखवताय तर मग ऊस दराबाबत का तत्परता का दाखवत नाही , कारखानदारवर येवढे प्रेम दाखवता तसेच प्रेम शेतकऱ्यांवर ही दाखवा म्हणजे शेतकऱ्याला त्याचा घामाचे दाम मिळेल असे सुनावले यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व अकिवाट गावचे सरपंच विशाल चौगुले , सुधाकर पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, प्रकाश पाटील, विजय पाटील, अनिल पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT