कोल्हापूर : दिवाळीनिमित्त गुरुवारी (दि. 31) जिल्हाधिकार्यांनी सुट्टी जाहीर केल्यामुळे गुरुवारपासून चार दिवस शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.
शुक्रवारी (दि. 1) लक्ष्मीपूजन असल्यामुळे शासकीय सुट्टी आहे. त्यानंतर शनिवारी व रविवारी नियमित सुट्टीच असते. त्यामुळे आता सोमवारीच (दि. 4) शासकीय कार्यालये सुरू होतील. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शासकीय कार्यालयातील उपस्थिती कमी होती. दुपारनंतर तर कार्यालयातील काही विभागांत शुकशुकाट दिसत होता.