Gokul Dudh Sangh Kolhapur 5 Member Administrative Board
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ विद्यमान संचालकांची मुदत संपल्याने कायद्यातील बदलानुसार सोमवारी ( दि.४) प्रशासक नियुक्तीचे आदेश निघाले. गोकुळमध्ये ५ जणांच्या प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील संबंधित कलमानुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे.
पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी हा आदेश काढला असून, संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने व पुढील कारभारात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अध्यक्ष : संजयकुमार विश्वनाथ सुद्रीक (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा)
प्रदीप महादेव मालगावे (सहाय्यक निबंधक, चंदगड, जि. कोल्हापूर)
सुनील रामचंद्र धायगुडे (सहाय्यक निबंधक, जुन्नर, जि. पुणे)
सागर बलकवडे (लेखापरीक्षक, सहकारी संस्था, कोल्हापूर)
चंद्रकांत परुळेकर (कक्ष अध्यक्ष, धर्मादाय रुग्णालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर)