मृत सुनीता केसरकर, आरोपी प्रवीण चिंचेवाडी  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Crime | भडगावचा खून अनैतिक संबंधातून: प्रियकराकडून गळा दाबून खून; वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा बनाव उघड

Gadhinglaj Murder Case | बेपत्ता महिलेचा २१ दिवसांनी महागाव जंगलातील झरा ओढ्यात मृतदेह आढळला

पुढारी वृत्तसेवा

Gadhinglaj Bhadgaon Murder Case

गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील सुनीता संजय केसरकर (वय ४०) हिचा मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाल्याचा बनाव अखेर पोलिसांनी उघडकीस आणला. सहा वर्षांपासून अनैतिक संबंध असलेल्या प्रियकरानेच तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी (वय ३४, रा. भडगाव) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.

सुनीता १८ जानेवारी रोजी आठवडी बाजारासाठी घरातून बाहेर पडली होती. ती बेपत्ता झाल्यानंतर २१ दिवसांनी महागाव जंगलातील झरा ओढ्यात तिचा मृतदेह आढळला. सुरुवातीला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज होता. मात्र मृतदेहावर दागिने व मोबाईल नसणे, तसेच ती एकटी जंगलात जाण्याची शक्यता कमी असल्याने पोलिसांना संशय आला.

तपासादरम्यान सुनीता व प्रवीण यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. प्रवीण मोबाईल बंद करून गायब झाल्याने संशय बळावला. १४ फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली. संसार उद्ध्वस्त होण्याच्या भीतीतून त्याने सुनीताचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले.

दागिने व मोबाईल काढून टाकल्यानेच आरोपीचा बनाव उघड झाला असून पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे खून उघडकीस आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT