Flower Market  AI Image
कोल्हापूर

Flower Price Hike | फुलांना सोन्याचे भाव! उत्पादन घटल्याने बाजारपेठांमध्ये दर दुप्पट

कोल्हापूरसह शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजी परिसरातील बाजारपेठांमध्ये विविध फुलांच्या मागणीत मोठी वाढ

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Flower Market

शिरढोण: लग्नसराईचा हंगाम आणि वाढते शुभमुहूर्त यामुळे जिल्ह्यातील फुलबाजार सध्या फुलून गेले आहेत. कोल्हापूरसह शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजी परिसरातील बाजारपेठांमध्ये विविध फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, उत्पादन घटल्याने दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे फुलांना अक्षरशः सोन्याचे भाव आले आहेत.

महिलांच्या आवडीचा मोगरा सर्वाधिक महागला असून त्याचा घाऊक दर ८०० ते १३०० रुपये शेकडा, तर किरकोळ बाजारात ५०० ते ७५० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गुलाबाला विवाह सोहळे आणि सत्कार कार्यक्रमांमुळे मोठी मागणी असून त्याचे दर १०० ते २०० रुपये किलो आहेत. सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या झेंडूचा भाव २०० रुपये किलोपर्यंत गेला आहे. निशिगंध २५० ते ३५० रुपये किलो, तर जरबेरा ४ ते १२ रुपये प्रति नग या दराने विकला जात आहे.

तीव्र उष्णता, पाणीटंचाई आणि उत्पादनात झालेली घट यामुळे बाजारातील फुलांची आवक कमी झाली आहे. दुसरीकडे, एकाच दिवशी अनेक विवाहसोहळे होत असल्याने मागणी वाढली आहे. मंडप, स्टेज, वधू-वरांच्या गाड्या आणि स्वागत कमानींसाठी विविध शोभिवंत फुलांचा वापर वाढल्याने दरांमध्ये आणखी वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पुढील काही दिवस लग्नसराई कायम राहिल्यास फुलांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

... दरवळला सुगंध, दरात तेजी...

कोल्हापूर, शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजीतील फुलबाजारात लग्नसराईमुळे मोठी तेजी आली आहे. मोगरा ८०० ते १३०० रुपये शेकडा, झेंडू २०० रुपये किलो, तर निशिगंध २५० ते ३५० रुपये किलो दराने विकला जात आहे. तीव्र उष्णतेमुळे उत्पादन घटले असून वाढत्या मागणीमुळे फुलांचे दर दुप्पट झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT