कोल्हापूर

fire broke out News : नागांव येथे ऑटो गॅरेजला शॉर्ट सर्किटने आग

मोहन कारंडे

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नागांव येथील श्री दत्त ऑटो गॅरेजला शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत गॅरेजचे मोठे नुकसान झाले. यावेळी मोठा स्फोट झाल्याने परिसर हादरला. ही आग शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास लागली. घटनास्थळी अग्नी शामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

नागांव हद्दीत श्री दत्त ऑटो गॅरेज हे गेली तीन वर्षांपासून सुभाष बिडकर यांच्या जागेत भाड्याने असून येथे ट्रक सारख्या आवजड वाहणांची रिपेरिंग व त्यासाठी लागणारे स्पेअर्स पार्टस व ऑईल विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. गॅरेज मालक महेश घाटगे व त्यांचे अन्य दोघे पार्टनर हे गॅरेज बंद करून घरी गेले असता गॅरेजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण करून आगीचे व धुराचे लोट निघू लागले. ही घटना लोकांच्या निदर्शनास आल्यावर गॅरेज मालक व जागा मालक यांना माहिती दिली. आग विझवण्यासाठी कोल्हापूर व पेठ वडगाव अग्नी शामक दलास पाचारण केले. गॅरेजमध्ये असलेले साहिल ऑईलचे कॅन, वायर, केबल, कागदी पुट्टे, मोटरसायकल या आगीच्या भस्मस्थानी पडले. दोन्ही अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग अटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

घटनास्थळी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसात झाली आहे. अधिक तपास स.पो.निरिक्षक पंकज गिरी करत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT