कोल्हापूर

कोल्हापूर: केळोशी बुद्रुक येथे कौटुंबिक वादातून मुलाकडून बापाचा खून

अविनाश सुतार

धामोड: पुढारी वृत्तसेवा:  केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे कौटुंबिक वादातून मुलाने स्वतःच्या बापाचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नातवाने वडिलांच्या विरोधात राधानगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

राधानगरी पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, केळोशी बुद्रुक येथे सावरीचा माळ नावाच्या शेतामध्ये तुकाराम दौलू मगर (वय ६५)   यांचा त्यांचाच मुलगा प्रकाश तुकाराम मगर याने दोरीने गळा आवळून खून केली. या प्रकरणी नातू आकाश आनंदा मगर याने फिर्याद दिली.

संशयित आरोपी प्रकाश तुकाराम मगर व वडील यांची वारंवार भांडणे होत होती. या भांडणाच्या रागातून त्याने वडिलांचा गळा आवळून खून केल्याचे फिर्यादीत नोंद झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर, हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर, गोपनीय विभागाचे कृष्णात यादव करत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT