कोल्हापूर

Kolhapur crime : विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाचा तपास; शाळेत फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाची तपासणी

पालकमंत्री अबिटकर यांच्या आदेशामुळे तपासाची चक्रे गतिमान

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : पोलीस ठाण्याच्या परिसरातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाला वैज्ञानिक आधार देण्यासाठी राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएल) फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून विविध तांत्रिक व वैज्ञानिक तपासणी केली. यावेळी तपासासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले.

दरम्यान पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी याप्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिल्याने पोलीस प्रशासनातर्फे तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत. फॉरेन्सिक पथकाने सर्वप्रथम घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तेथील परिस्थितीची नोंद घेतली. त्यानंतर संगणक कक्षासह संबंधित ठिकाणांचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण केले. घटनास्थळावरील बोटांचे ठसे, स्पर्शचिन्हे, सूक्ष्म भौतिक पुरावे तसेच तपासासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या विविध वस्तूंची तपासणी केली.

याशिवाय शाळेतील संगणक व इतर डिजिटल उपकरणांशी संबंधित तांत्रिक माहितीची पडताळणी करण्यात आली. आवश्यक ते डिजिटल पुरावे आणि इतर नमुने पुढील प्रयोगशाळा तपासणीसाठी संकलित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा वैज्ञानिक पद्धतीने जतन करून त्याचे दस्तऐवजीकरण केले आहे.

तसेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमधील अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने घटनास्थळीच प्राथमिक न्यायवैद्यक तपासणी करण्यात आली. या तपासातून मिळालेला अहवाल आणि संकलित करण्यात आलेले पुरावे पुढील तपासासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतही या वैज्ञानिक पुराव्यांना विशेष महत्त्व असल्याने पोलिसांनी तपास अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT