चंदगड : कामगार संघटनेचे सचिव अशोक गावडे यांना उसाचा रस पाजताना कॉ. उदय नारकर. शेजारी विशाल घोडके, विजय देवणे, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे आदी मान्यवर. Pudhari
कोल्हापूर

Daulat Sugar Factory | दौलत कामगारांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; सहाय्यक कामगार आयुक्तांचे लेखी आश्वासन

Kolhapur News | कोल्हापुरातील बैठकीत गुरुवारी अंतिम निर्णय अपेक्षित

पुढारी वृत्तसेवा

Chandgad Daulat Sugar Factory Labor Hunger Strike
चंदगड :
हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व–दौलत साखर कारखान्यातील कामगारांनी २ एप्रिलपासून सुरू केलेले आमरण उपोषण दहा दिवसांनंतर शनिवारी (दि. ११) सायंकाळी स्थगित करण्यात आले. सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी (दि. १६) कोल्हापूर येथे होणाऱ्या बैठकीत त्रिपक्षीय वेतन करार, हंगामी कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेणे तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक व अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन घोडके यांनी दिले आहे.

या पार्श्वभूमीवर विशाल घोडके, कॉ. उदय नारकर, उबाठा शिवसेनेचे नेते विजय देवणे, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार, उपाध्यक्ष महादेव फाटक यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना उसाचा रस पाजून आंदोलनाची सांगता करण्यात आली.

या उपोषणात सहभागी कामगार संघटनेचे सचिव अशोक गावडे, संजय राऊत, पांडुरंग रेडेकर, कृष्णा कांबळे, मल्लाप्पा आतवाडकर, चंद्रकांत केसरकर, निवृत्ती चौकुळकर यांचा पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान, या प्रश्नावर पंधरवड्यातील दुसरी बैठक गुरुवारी (दि. १६) कोल्हापूर येथे होणार असून या बैठकीतील निर्णयाकडे कामगारांचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT