कोल्हापूर

कोल्हापूर : मुरगूडमध्ये वाढीव घरफाळ्याविरोधात भाजपचा नगरपालिकेवर मोर्चा!

निलेश पोतदार

मुरगूड : पुढारी वृत्तसेवा;  मुरगूड शहरातील मिळकतधारकांच्या मालमत्ता करात (घरफाळा) प्रचंड वाढ झाल्याच्या निर्षधार्थ आज (बुधवार) भाजपच्या वतीने मुरगूड नगरपालिकेवर मोर्चा काढून घरफाळा वाढीस विरोध दर्शविण्यात आला. दर चार वर्षांनी होणाऱ्या मूल्यांकनाद्वारे मुरगूड शहरातील घरांना घरफाळा आकारणी करण्यात आली आहे.

घरगुती 'व्यापारी व औद्योगिक अशा वर्गीकृत रचनेद्वारे ही आकारणी करण्यात आली आहे. मात्र ती अन्यायी आहे. शहराचे विकसीकरण तसेच पालिका 'क' वर्गातील आहे. असे असताना याचा विचार करता घरफाळा वाढ अवास्तव असल्याची तक्रार नागरिकांतून होत आहे. या संदर्भात नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तेव्हा ही वाढ मागे घ्यावी अशी मागणी भाजपच्यावतीने पालिकेवर मोर्चा काढून करण्यात आली.

यावेळी प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजना लाभार्थ्यांना अनुदान देण्यास विलंब होत आहे. ते तात्काळ मिळावे. तसेच या विभागाचे काम पाहणारे पालिकेतील तंत्र अधिकारी हे लाभार्थ्यांची कुचंबणा करतात. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा त्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

सदरचे निवेदन पालिका मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्याकडे सादर करण्यात आले. पालिकेवर काढण्यात आलेल्या मोर्चात भाजपचे अनंत फर्नाडिस, दत्तात्रय जाधव, अमर चौगले, सुशांत मांगोरे, दगडू शेणवी, संग्राम साळोखे, नाना डवरी, विजय गोधडे, सदाशिव गोधडे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT