म्हाकवे; पुढारी वृत्तसेवा आणूर ता कागल येथील स्नेहल दत्तात्रय शिंदे हिची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड झाली आहे. पंजाब येथे होणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. ती कोल्हापूर जिल्हा महिला कबड्डी संघाची कर्णधार आहे.
अगदी ग्रामीण भागात एका परीट घराण्यामध्ये स्नेहलचा जन्म झाला. तीचे वडील इस्त्रीचे काम करत आपल्या मुलींना शिक्षण देत आहेत. ती जय हनुमान कबड्डी मंडळाची खेळाडू आहे. स्नेहल हिने अगदी कष्ट करत राज्य संघापर्यंत यश मिळवले आहे. लहानपणापासून तिला कबड्डीची आवड होती. अगदी शालेय स्पर्धेपासून ती चमकत आहे. तालुका संघ जिल्हा संघ, विद्यापीठ संघ आदी संघाचे तिने नेतृत्व केले आहे. अगदी भूमीहीन कुटुंबात तिचा जन्म झाला असून, आई-वडील रोजंदारी करतात. अशा परिस्थितीतीतून आलेल्या गुणवान खेळाडूची राज्य संघात निवड झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा :