Konkan Cashew  Pudhari
कोल्हापूर

Cashew plantation scheme Kolhapur | मागेल त्याला मोफत 'काजू' कलमे योजना; कृषी विभागाची योजना

जिल्ह्यातील पाच डोंगराळ तालुक्यात महत्त्वपूर्ण योजना जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Free cashew saplings scheme Kolhapur

आशिष पाटील

गुडाळ : प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच डोंगराळ तालुक्यात मागेल त्याला काजू कलमे ही शेतकऱ्यांना मोफत काजू कलमे देणारी महत्वकांक्षी योजना कृषी विभागाने जाहीर केले आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रति शेतकरी किमान पाच ते जास्तीत जास्त 50 काजू कलमे मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत 5 गुंठ्यापासून 25 गुंठे पर्यंत क्षेत्रात काजूची लागवड करता येईल.

ग्रामीण उद्योगाला चालना मिळावी आणि पर्यावरण पूरक शेतीला प्रोत्साहन मिळावे या हेतुने कृषी विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आणि प्रकल्प संचालक,आत्मा यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी लागवड क्षेत्राचा सातबारा, आठ अ,फार्मर आयडी,आधार कार्ड आणि काजू रोपांच्या मागणीचा अर्ज घेऊन महाडिबीटी च्या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन कसबा तारळे च्या सहाय्यक कृषी अधिकारी सविता बकरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT