कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा अलर्ट ठेवली आहे.
पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी चारही विभागीय कार्यालयातील सर्व निवारा केंद्रे सज्ज आहेत. महापालिकेने विभागीय कार्यालय क्र. १, गांधी मैदान अंतर्गत लक्ष्मीबाई जरग विद्यालय जरगनगर व रामानंदनगर तालीम, विभागीय कार्यालय क्र. २ छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत न्यायमूर्ती रानडे विद्यालय, मामा भोसले विद्यालय दुधाळी, आण्णासो शिंदे विद्यालय, माने हॉल फुलेवाडी, ग. गो. जाधव शाळा, गुणे बोळ,
आंबेडकर विद्यालय शाळा क्र. २९, भगतसिंग तरुण मंडळ जवळ, शहर डी. वाय. एस. पी. ऑफिसमागे, आंबेडकर हॉल समाज मंदिर, कामगार भवन, वसंत लिंगनूरकर, सिद्धार्थनगर, मोहामेडन सोसायटी लक्ष्मीपुरी, श्रमिक हॉल, मंडलिक वसाहत हॉल, वीर कक्कया विद्यालय व शिवाजी विद्यालय, विभागीय कार्यालय क्र. ३ राजारामपुरी अंतर्गत मुस्लिम बोर्डिंग व आर्य ब्राह्मण समाज बोर्डिंग दसरा चौक,
अंबाबाई शाळा, व्यापारी पेठ, पंत बाळेकुंद्री मार्केट, शाहूपुरी विभागीय कार्यालय क्र. ४, छ. ताराराणी मार्केट अंतर्गत न्यू पॅलेस शाळा, महाराष्ट्र विद्यालय, महावीर कॉलेज, महसूल भवन हॉल, दत्त मंदिर सांस्कृतिक हॉल, प्रिन्स शिवाजी विद्यालय, छाया पोवार, महाराष्ट्र विद्यालय, उलपे हॉल, प्रिन्स शिवाजी विद्याल जाधववाडी, समता हायस्कूल, कदमवाडी माझी शाळा, प्रिन्स शिवाजी विद्यालय, व्यायामशाळा सांस्कृतिक हॉल, जाधववाडी निवारा केंद्रे सज्ज आहेत.
महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार सर्व उप-शहर अभियंत्यांना निवारा केंद्रे सुस्थितीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सुतारवाडा येथील १८ पुरुष, १४ स्त्रिया व ८ लहान मुले असे ४० जणांचे चित्रदुर्ग मठ येथील निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळा, सांस्कृतिक हॉल येथे व्यवस्था केली आहे.