Sant Balumama Punyatithi Pudhari
कोल्हापूर

Admapur Balumama Temple | आदमापूर येथे बाळूमामांच्या ६०व्या पुण्यतिथीनिमित्त महा सप्ताहाला प्रारंभ

५५० वाचकांचा सहभाग; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Sant Balumama Punyatithi

मुदाळतिट्टा : सद्गुरू बाळूमामा यांच्या ६०व्या पुण्यतिथीनिमित्त आदमापूर (ता. भुदरगड) येथे भव्य अखंड हरिनाम महासप्ताहाला मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. पुण्यतिथीनिमित्त अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते अभिषेक, समाधी पूजन आणि वीणा पूजन करण्यात आले.

सप्ताहानिमित्त सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळूमामांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरातील गाभारा, समाधी आणि मूर्तीची विविध फुले व फळांनी आकर्षक आरास करण्यात आली आहे. समाधी पूजन व महाआरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

या कालावधीत काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, बाळूमामा विजय ग्रंथ पारायण, राम-कृष्ण-हरी जप, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आणि हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम दररोज होणार आहेत. महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार सप्ताहात आपली सेवा बजावणार आहेत.

अखंड हरिनाम महासप्ताहात तब्बल ५५० वाचक सहभागी झाले असून, त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. सप्ताहाच्या प्रारंभी अध्यक्ष रामनाथ मरेगुद्री, सर्व विश्वस्त, नानासाहेब पाटील, बाळासो पाटील, पांडुरंग सुतार, आनंदा पाटील, रामचंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ, परिसरातील भजनी मंडळे, वारकरी बांधव आणि बाळूमामांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्ताहामुळे आदमापूर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, पुढील सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT