पुलाची शिरोली येथील मदरसा जवळ भरधाव दुचाकी रस्त्याचा अंदाज न आल्याने मोठ्या पिलरवर जाऊन अडकली 
कोल्हापूर

Kolhapur Accident | सर्कशीतील स्टंटसारखी दुचाकी अडकली पिलरवर! दिशा दर्शकाअभावी अपघात

पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील मदरसा जवळील घटना, हेल्मेटमुळे वाचले दुचाकीस्वाराचे प्राण

पुढारी वृत्तसेवा

नागावः ही गाडी कोणत्या सर्कशीतील स्टंट नव्हे, की कोणत्या सिनेमाचे चित्रीकरणातील नव्हे तर ही दुचाकी गाडी आहे अपघातील.... कारण भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला दिशादर्शक फलक नसल्यामुळे रस्त्‍याचा अंदाज आला नाही. त्‍यामुळे तो थेट रस्ता कामासाठी ठेवलेले महाकाय पिलरवर जाऊन आपटला, त्‍याची दुचाकी थेट पिलरवर अडकली.

पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील मदरसा जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा गाडीचे नियंत्रण सुटल्याने आणि रस्त्याच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या महामाय पिलर वर दुचाकी अलगतपणे ठेवावी अशी जाऊन अडकली. या दुचाकीवरील स्वार उडुन जोरात आपटला पण त्याच्या डोक्यावर असलेल्या हेल्मेट मुळे त्याचे प्राण वाचले. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजण्यासुमारास घडला असून या अपघातात गडहिंग्लज जवळील निलजी गावचा संतोष हिरगोंडा पाटील ( वय 35 ) हा हेल्मेटमुळे सुखरूप बचावला पण त्याच्या हिरो होंडा स्प्लेंडरचे मोठे नुकसान झाले आहे..

पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर याच वळणावर पंधरा दिवसांतील हा दुसरा अपघात आहे. कोल्हापूर येथील एक वयोवृद्ध आपल्या कारने नागाव फाटा येथील आपल्या दुकानाकडे येत असताना दिशादर्शक फलक नसल्याने त्यांना वळणावर असलेल्या महाकाय पिलराला जोरदार वेगाने धडकली होती. यामध्ये कारमधील एअर बॅग वेळीच ओपन झाल्या होत्या त्यामुळे त्यांचे प्राण वाचले होते. .

सध्या महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने तर अनेक ठिकाणी रस्ता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे पण ते ही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे या परिसरातील अपघाताच्या घटना वाढत आहेत‌. रस्त्याचे काम कसेही होवो पण यामुळे नागरिकांचे जिव हाकनाक जात आहेत. ते जाऊ नयेत.‌ या साठी प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT