अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथील ग्रामसभेत गावच्या नामांतरच्या विषयावरून जोरदार गदारोळ झाला.  Pudhari News Network
कोल्हापूर

अब्दुललाट येथील ग्रामसभा नामांतरवरून गाजली

Kolhapur Gram Sabha News | 'अमृतलाट' नावाचा ठराव बहुमताने मंजूर

पुढारी वृत्तसेवा

अब्दुललाट : पुढारी वृत्तसेवा : अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथील ग्रामसभेत गावच्या नामांतरच्या विषयावरून जोरदार गदारोळ झाला. 'अमृतलाट' या नावासाठी ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. याचबरोबर समता नगर येथील काही भागात रस्ते, गटारी व इतर नागरी समस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामसचिवलायात येथील ग्रामस्थ व महिलांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या विषयावरूनही ग्रामसभेत मोठा गोंधळ निर्माण झाला. (Kolhapur Gram Sabha News)

अनेक विषयांवर चर्चा, पोलिसांचा बंदोबस्त

अब्दुल लाट येथील ग्रामसभा सचिवालयाच्या पायरीवरच पार पडली. यावेळी महिला सुरक्षा, अवैध धंदे, गावातील व्यसनाधीनता, विकास कामे, नागरी सुविधा आदींसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. अब्दुल लाट या गावच्या नावाच्या नामांतरावरून प्रचंड गदारोळ आणि वादळी चर्चा घडून आली. शेवटी ग्रामसभेत बहुमतांनी 'अमृतलाट' या नावासाठी ग्रामसभेत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. या नावासाठी तरुण, महिला, युवती, ग्रामस्थ यांनी जोरदारपणे समर्थन दर्शवले. तर काहींनी यासाठी विरोध करत विशेष ग्रामसभा बोलवण्यात यावी व निर्णय घ्यावा, असे मत मांडले . परंतु, ग्रामसभेत ठराव बहुमतांनी मंजूर करण्यात येतात, असे ग्रामप्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी कुरुंदवाड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी ग्रामविकास अधिकारी विजयसिंह रजपूत, सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे, आरोग्य विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आदींसह अशोक चौगुले, रमेश शेट्टी, भूपाल गिरमल, आदगोंडा पाटील, अनिल चौगुले, रमेश चव्हाण, सागर गिरमल, अभिजीत पाटील, चतुर ठिकणे, भाऊसाहेब कदम, सागर चौगुले, पोपट आक्कोळे, बंडू चौगुले, पवन शेळके, योगेश कोळी, चेतन कोळी, सचिन पाटील, सतिश कुरणे, मिलिंद कुरणे, देवेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.(Kolhapur Gram Sabha News)

अब्दुल नावाच्या सेनापतीच्या नावावरून गावाला नाव

'अब्दुल या' मुस्लिम नावाला विरोध नसून इतिहास काळात लाट गावच्या नावात ज्या अब्दुल नावाच्या सेनापतीच्या नावावरून हे नाव गावाला पडले. तो विजापूरच्या आदिलशाहीचा हस्तक म्हणून या ठिकाणी नियुक्त होता. तसेच पूर्वी लाट गावात टेहाळणी करणे, हेरगिरी करणे, जाचक कर वसुली करणे, असे अनेक जबाबदाऱ्या त्याच्यावर देण्यात आल्या होत्या. तर त्याच्याकडून येथील जनतेवर अनन्वित अत्याचार सहन करावा लागत असे, असे सांगण्यात येते.

आजही  'अमृतलाट' असाच उल्लेख

तर लाट गावचे प्राचीन नाव 'अवलदुर्ग' असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे प्राचीन नाव बदलून 'अमृतलाट' हे नाव येथील साधू संत, महान व्यक्ती यांच्या मुखातून बोलले जायचे. आजही येथे प्रवचन, समाजप्रबोधन करत असताना 'अमृतलाट' असाच उल्लेख केला जातो. त्यामुळे अमृतलाट या नावासाठी कोणीही विरोध करू नये. तसेच गैरसमज करून घेऊ नये, अशी विनंती ग्रामस्थांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT