कोल्हापूर

कोल्हापूर : पन्हाळ्याचा होणार कायापालट! वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून साडेसहा कोटी मंजूर

मोहन कारंडे

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेस राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण काम योजनेअंतर्गत साडेसहा कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेचे प्रशासक चेतन कुमार माळी यांनी दिली. या निधीतून पन्हाळा सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या : 

याबाबत अधिक माहिती देताना प्रशासक माळी म्हणाले की, पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेस राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी साडेसहा कोटी रुपये विशेष अनुदान दिले आहे. या रक्कमेतून पन्हाळा येथील ऐतिहासिक चार दरवाजा येथील साधोबा तलाव व परिसरातील सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपये तर पन्हाळा येथील इंटरप्रिटेशन सेंटर इमारत व परिसर सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपये व पर्यटकांसाठी पन्हाळा येथे निवास बांधणी करिता ५० लाख रुपये, असे साडेसहा कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. याबाबत पन्हाळा, शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या प्रयत्नातून पन्हाळा नगर परिषदेस साडेसहा कोटी रुपये मिळाले असल्याचे माळी यांनी बोलताना सांगितले.

३१ मार्च २०२५ अखेर हा निधी खर्च करण्यात यावा, असेही शासनाने दिलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे. अन्यथा हा निधी खर्ची न पडल्यास संबंधितांनी व्याजासह शासनाच्या खाती जमा करावयाचा आहे, असेही पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. पन्हाळा येथील साधोबा तलाव सुशोभित करणे व तेथील संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी पन्हाळा नागरिकांनी आमदार कोरे यांना निवेदनाद्वारे केली होती. याची दखल घेऊन आमदार कोरे यांनी तातडीने शासनाकडून तीन कोटींचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल पन्हाळा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने कोरे यांचे आभार मानण्यात आले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT