कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चूरस सुरू आहे. दरम्यान, खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब आसुर्लेकर निवडणुकीत विजयी झाले आहेत. (KDCC Bank election update)
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील टोकाला पोहोचलेली ईर्ष्या पाहता आज काही गटांत धक्कादायक निकाल लागले आहेत. सत्ताधारी आघाडीच्या विकास संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. सेवा संस्थांच्या जागेपेक्षा कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया गटाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीकडून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर व खा. संजय मंडलिक रिंगणात होते. आसुर्लेकर यांना आ. विनय कोरे यांनी थेट विरोध होता. त्यामुळे ईर्ष्या अधिक टोकाला गेली. आसुर्लेकर यांना परिवर्तन पॅनेलमधून उमेदवारी देत सत्ताधार्यांना आव्हान दिले. आसुर्लेकर व मंडलिक यांनी या गटातून बाजी मारली
हेही वाचा: