कोल्हापूर : माळशिरस येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे. समवेत डॉ. स्मिता जाधव, माजी आमदार राम सातपुते आदी. (छाया: पप्पू आतार) 
कोल्हापूर

Kaustubh Gawade Pune Teacher constituency | माळशिरसमध्ये कौस्तुभ गावडे यांची दमदार मोर्चेबांधणी

Kaustubh Gawade campaign in Malshiras - भाजप-महायुतीच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; शिक्षकांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रचाराला वेग दिला आहे. माळशिरस येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे महायुतीची एकजूट अधोरेखित झाली आहे.

याप्रसंगी गावडे यांनी शिक्षक, पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराची रणनीती मजबूत केली. शिक्षकांचे प्रश्न योग्य व्यासपीठावर प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका मांडली. प्रचार सभा, महायुतीच्या नेत्यांची एकजूट व शैक्षणिक संस्थांमधील थेट संवादामुळे त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रचार दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, रावेरचे आमदार अमोल जावळे, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख आदी उपस्थित होते.

दरम्यान, कौस्तुभ गावडे यांनी हनुमान शिक्षण प्रसारक संस्था संचलित गोपाळराव देव प्रशाला, ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालय तसेच मारुतीनाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक विभागाला भेट दिली. याप्रसंगी शिक्षकांच्या समस्या, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने, प्रलंबित प्रश्न व शिक्षकांच्या अपेक्षांवर चर्चा करण्यात आली. संस्थेचे संचालक संतोष पांडुरंग कुलकर्णी, प्राचार्य सूर्यकांत सिद्राम जानकर, पर्यवेक्षक हनुमंत रंगराव बाबर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कांबळे व अॅड. शरद मदने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT