Kasari Dam 
कोल्हापूर

Kasari Dam : कासारी धरण ८० टक्के भरले; प्रतिसेकंद १ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

दिनेश चोरगे

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : विशाळगड परिसरात सोमवारी (दि. २४) पावसाचा जोर ओसरला होता. पावसाने उघडीप दिल्याने उन्हानेही दर्शन दिले. पावसाने उघडीप दिली असली तरी एखादी पावसाची सर सर्वत्र पाणीच पाणी करत होती. येथील कासारी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत १७१ मिमी पाऊस झाला. धरणात ७९.७० टक्के पाणीसाठा असून धरण २.७७ टीएमसी पैकी २.२१ टीएमसी भरले आहे. १ जून ते आजअखेर धरण क्षेत्रात २१९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याचदिवशी २२०८ मिमी पाऊस झाला होता. धरणातून प्रतिसेकंद १००० क्युसेस पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात सुरू आहे. परिसरात पावसामुळे दोन दिवसापासूनविजेचा खेळखंडोबा सुरू आहे. (Kasari Dam)

कासारी मध्यम प्रकल्पातील येणाऱ्या पाण्याचा (येवा) आणि पुढील पाच दिवसाचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता मंजूर धरणाद्वारे परीचलानानुसार कासारी धरणातून आज (दि २४) रोजी सकाळी ८ वाजता सांडव्यावरून २५० क्युसेसने विसर्ग वाढविण्यात आला आहे. सांडव्यावरून आत्ता ७५० क्यूसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पॉवर हाऊसमधून २५० क्यूसेस असा एकूण एक हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात सुरू असल्याची माहिती शाहूवाडी आपत्ती नियंत्रण कक्षातून नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी दिली. (Kasari Dam)

कासारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून विशाळगड परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे.तसेच येथील बीएसएनएल रेंजचा पत्ता गुल झाल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने गिरगाव येथील विलास दगडू कांबळे यांच्या जनावरांच्या गोठ्याची पडझड झाली, परळे येथील सोनाप्पा नारायण कांबळे यांच्या घराची भिंत पडली, रेठरे येथील बाळकाबाई धोंडीबा लोहार (भराडवाडी) यांच्या घराची मागील भिंत पडली, माण येथील रवींद्र विष्णू चौगुले, आकाराम तुकाराम पाटील घराची भिंत पडून नुकसान झाले.

आंबा मंडल केंद्रात सर्वाधिक १६६५ मिमी पावसाची नोंद

तालुक्यातील सहा मंडल केंद्राचा विचार करता आंबा मंडल केंद्रात सर्वाधिक १६६५ मिमी पावसाची आजअखेर नोंद झाली आहे. सर्वात कमी सरूड मंडलात पाऊस झाला आहे. आपत्ती निवारण कक्षातून दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात सोमवारी (दि २४)  सकाळी आठ वाजेपर्यत मंडलनिहाय २४ तासांत व आजअखेर कंसात पावसाच्या मिमीटरमध्ये नोंदी अशा: भेडसगाव : ५१.३ (५१४), बांबवडे : ३४.३ (४२८),   करंजफेन : ५८.५ (१००२) , सरूड : ३६ (४०४), मलकापूर : ५४ (४७६), आंबा ६९ (१६६५) असा मिलीमीटर पाऊस झाला आहे. (Kasari Dam)

 कासारी मध्यम प्रकल्प,गेळवडे ता. शाहूवाडी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे करिता मंजूर धरण द्वार परिचलनानुसार धरणाच्या वक्र द्वाराद्वारे ७५० क्यूसेस व वीज निर्मिती गृहाद्वारे २५० क्यूसेस असा एकूण १००० हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तरी कासारी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देणेत येत आहे.
पूर नियंत्रण कक्ष, कोल्हापूर पाटबंधारे विभाग, कोल्हापूर.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT