Kolhapur news 
कोल्हापूर

Karanjafen Gram Panchayat | ग्रामपंचायत उपसरपंचपदी पल्लवी वागरे! ग्रामपंचायतीचा कारभार सासु - सुनेकडे...

उपसरपंच बंडोपंत मोहिते यांनी आघाडीच्या धोरणाप्रमाणे राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

गुडाळ : राधानगरी तालुक्यातील करंजफेण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिद्री संचालक राजू भाटळे गटाच्या सौ. पल्लवी अनुपम वागरे यांची बिनविरोध निवड झाली. कृष्णा वागरे गटाचे उपसरपंच बंडोपंत मोहिते यांनी आघाडीच्या धोरणाप्रमाणे राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली.

विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून एकाच घरात राहणाऱ्या सौ. पल्लवी यांच्या चुलत सासू श्रीमती जयश्री सखाराम वागरे या काम पाहत असून त्या विरोधी गटात आहेत. सत्तारूढ आघाडीच्या विरोधात लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक अपक्ष लढवून त्या सरपंच झाल्या आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीची विशेष सभा झाली. एका अर्थाने करंजफेण गावचा कारभार सासु- सुनेच्या हातात आला आहे.

या निवडी वेळी माजी पोलीस पाटील ज्ञानदेव पाटील, ॲड. बाबासाहेब वागरे, अनुपम वागरे ,हरिभाऊ वागरे, बाबुराव वागरे, ग्रामपंचायत अधिकारी यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT