सातापा संतु कांबळे (Pudhari Photo)
कोल्हापूर

Kagal News | सोनगे येथे भिंत अंगावर कोसळून वृद्ध जागीच ठार

Kolhapur Senior Citizen Death | घटनेची मुरगूड पोलिसांत नोंद

पुढारी वृत्तसेवा

Kagal Sonage Wall collapse Elderly person killed

कोल्हापूर : सोनगे (ता. कागल ) येथे घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी जुनी भिंत अंगावर पडून सातापा संतु कांबळे (वय ६५) हे जागीच ठार झाले. या घटनेची मुरगूड पोलिसांत नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनगे येथील सातापा संतू कांबळे यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. यावेळी कांबळे हे चिरे उचलत असताना अचानक जुन्या घराची भिंत त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्यास व हातापायास गंभीर इजा झाली त्यात ते जागीच ठार झाले. मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची मुरगूड पोलिसांत नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT