हातकणंगले : कागल येथील पंचतारांकित एमआयडीसीमधील अपोलो कंपनीच्या गोडाऊनमधून 39 टायर भरून वितरण करण्यासाठी घेऊन जात असताना परस्पर त्या काढून घेतल्याने दोघांवर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अमित बाबासो जाधव (वय 31, रा. सरवडे, ता. तासगाव) व प्रदीप राजेंद्र बंडगर (30, मणेराजुरी, ता. तासगाव) अशी त्यांची नावे आहेत. कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अपोलो कंपनीच्या टायर गोडाऊनमधून अमित जाधव याने वेगवेगळ्या आकाराच्या 6 लाखांच्या 39 टायर घेऊन तेज टायर्स शिरोळ, हातगणी टायर्स सांगली व माऊली बालाजी टायर्स तासगाव येथील वितरकांना देण्यासाठी घेऊन गेला होता.
सरस्वती वजन काटा रुई फाटा येथून परस्पर त्या लंपास केल्या. याबाबतची फिर्याद भगवान राम शिंदे यांनी हातकणंगले पोलिसांत दिली. अधिक तपास उपनिरीक्षक नानासाहेब पवार करीत आहेत.