कोल्हापूर

कोल्हापूर : आव्हाड यांच्या वक्तव्याचा मुरगूड येथे जाहीर निषेध

मोहन कारंडे

मुरगूड; पुढारी वृत्तसेवा : प्रभू श्री राम यांच्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुरगूड येथे शिवभक्तांनी जाहिर निषेध केला.

२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आणि मंदिराचा सोहळा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या संदर्भात आव्हाडांचे वक्तव्य निंदनीय आहे. छत्तीसगड महाराष्ट्र हिंदू जनजागृती समिती समन्वयक सुनील घनवट यांनी बोलताना सांगितले की, साडेपाचशे वर्षांपासून ज्या अमृत सोहळ्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे, त्या सोहळ्याला गालबोट लावण्याचे काम जितेंद्र आव्हाडांसारखे नेते करत आहेत. त्यांनी प्रभू राम यांच्याबद्दल केलेले अक्षम्य विधान खपवून घेतले जाणार नसल्याच्या ते म्हणाले. ओंकार पोतदार यांनी आपल्या प्रास्ताविकातून आव्हाड यांनी केलेल्या वक्तत्वाचा समाचार घेतला. प्रभू राम कोणत्याही एका जाती धर्माचे किंवा समुदायाचे दैवत नसून संपूर्ण भारत वर्षाला मार्गदर्शन ठरणारे दैवत आहेत. प्रभू रामरायाच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अशी बेताल वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, असे ते म्हणाले.

यावेळी हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक किरण जोशी, श्री राम जन्मभूमी न्यास मुरगुड उपखंड प्रमुख तानाजी भराडे, शहरप्रमूख सर्जेराव भाट, प्रकाश परिषवाड, जगदीश गुरव, सुभाष अनावकर, पृथ्वी चव्हाण, सुशांत महाजन, रणजीत मोरबाळे, अमर चौगुले, मध्वानंद पाटील (यमगे), पंकज नेसरीकर, पवन लाड आदि उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT