Rishikesh Alase Pudhari
कोल्हापूर

UPSC परीक्षेत जयसिंगपूरचा ऋषिकेश आलासे चमकला: ६१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

Rishikesh Alase Jaisingpur | सुरुवातीच्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश, तिसऱ्यांदा यशाला गवसणी

पुढारी वृत्तसेवा

Rishikesh Alase Rank 61 UPSC

जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील ऋषिकेश राजेंद्र आलासे (वय २७) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. देशभरातून घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धात्मक परीक्षेत त्यांनी ६१ वा क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ऋषिकेश यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सांगली येथे झाले, तर त्यानंतरचे शिक्षण मुंबई येथे पूर्ण झाले. विद्यार्थी दशेतच त्यांनी राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षेत (NTSE) देशात १७ वा क्रमांक मिळवला होता. UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सुरुवातीच्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश आले असले तरीही त्यांनी जिद्द न सोडता अभ्यास सुरू ठेवला.

“कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचे” हा निर्धार ठेवून त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि परीक्षेची काटेकोर तयारी केली. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात त्यांनी देशात ६१ वा क्रमांक मिळवून मोठे यश संपादन केले.ऋषिकेश यांचे वडील राजेंद्र आलासे आणि आई विद्या आलासे हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि आत्मविश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सातत्याने अभ्यास केल्यास यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो.
- ऋषिकेश आलासे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT