

UPSC Civil Services 2025 लोकसेवा आयोगाने आपला अंतिम रिजल्ट आपल्या वेबसाईटवर आज 6 मार्च घोषित केला असून यामध्ये राजस्थानचेमधील अनुज अग्निहोत्रीने टॉप केले आहे. सिव्हील सर्व्हिसेसमध्ये त्याने टॉप केले आहे. अनुज हा मेडीकल क्षेत्रातील विद्यार्थी आहे. अनुजने अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक (AIR 1) पटकावला आहे. राजेश्वरी सुवे एम ही दुसऱ्या स्थानी आली आहे तर आकांश धूल याने तिसरे स्थान पटकावले आहे.
राजस्थानमधील रावतभाटा येथील रहिवासी
अनुज अग्निहोत्री हा राजस्थानमधील रावतभाटा या छोट्या शहरातील येथील रहिवासी आहे. तो एमबीबीएस (MBBS) पदवीधर झाल्यानंतर अनुजने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याऐवजी लोकप्रशासनाचा मार्ग निवडला आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश संपादन केले आहे. अनुज याचे मुळ गाव हे रहाटा आहे पण त्यांचे वडील रावतभाटा येथे काम करत होते. ते राजस्थान अनुविद्युत केंद्रात काम करतात. अनुज यांची सुरवातीचे शिक्षण रावतभाटा येथील केंद्रीय विद्यालयात झाले आहे. त्यानंतर त्यांनी जोधपूरमध्ये एम्समध्ये शिक्षण घेतले.
एम्स जोधपूरमधून वैद्यकीय शिक्षण
अग्निहोत्री यांचे प्राथमिक शिक्षण अणुऊर्जा प्रकल्पांसाठी प्रसिद्ध असलेल्या रावतभाटा या छोट्या शहरात झाले. त्यानंतर त्यांनी जोधपूर येथील 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (AIIMS) मधून २०२३ मध्ये वैद्यकीय पदवी पूर्ण केली. मात्र, रुग्णालयातील सेवा करण्याऐवजी प्रशासकीय कार्यात रस असल्याने त्यांनी नागरी सेवांकडे वळण्याचा निर्णय घेतला. एम्समधून पदवी घेतल्यानंतर अनुज सध्या Danics या केंद्रीय संस्थेत Central Civil Services (Group-B) प्रशासकिय सेवा करत आहे
'Ensure IAS' या संस्थेसोबत झालेल्या त्यांच्या सराव मुलाखतीचा (Mock Interview) व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी सार्वजनिक धोरण, प्रशासन आणि नैतिक प्रश्नांची उत्तरे अतिशय आत्मविश्वासाने दिली आहेत. विशेष म्हणजे, ज्या प्रश्नांची उत्तरे त्यांना माहित नव्हती, तिथे त्यांनी "मी याबद्दल नक्की वाचन करेन," असे म्हणत आपली बौद्धिक प्रामाणिकता सिद्ध केली.
अग्निहोत्री यांच्या यशामागे केवळ पाठांतर नसून विषयांची सखोल समज आणि विनम्र स्वभाव असल्याचे त्यांच्या मुलाखतीतून दिसून येते. एका छोट्या शहरातून येऊन देशातील सर्वात कठीण परीक्षेत अव्वल स्थान मिळवल्याबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.