आयजी सुनिल फुलारी यांच्यासमवेत यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत, कोल्हापूर शहर डीवायएसपी अजित टिके, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा तानाजी सावंत, तसेच औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष सुरेन्द्र जैन, नितीनचंद्र दळवाई, हरिश्चंद्र धोत्रे व उद्योजक. 
कोल्हापूर

उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन कटीबद्ध; आयजी सुनील फुलारी यांचे अश्वासन

करण शिंदे

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : उद्योजकांच्या समस्या पोलिस प्रशासनाकडून सोडविल्या जातील. त्यासाठी दोन महिन्यातून एकदा उद्योजकांबरोबर ज्या त्या औद्योगिक क्षेत्रातील ठाणेदार यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी, शिरोली येथील पोलीस प्रशासन आणि उद्योजकांची बैठकीत दिली.

पोलिस प्रशासनाशी संबंधित असणार्‍या उद्योजकांच्या विविध समस्या जाणून घेण्याकरिता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, कोल्हापूर शहर ऐसीपी अजित टिके, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रवींद्र कळमकर आदी उपस्थित होते. बैठकीस शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल – हातकलंगले मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी बोलताना फुलारी म्हणाले, उद्योजक त्यांच्या उद्योग क्षेत्रात हजारो लोकांना रोजगार देतात. त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलिस प्रशासन यापुढेही दक्ष राहील. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उद्योजकांचे मोठे सहकार्य पोलिस प्रशासनास मिळते असे ते म्हणाले.

दरम्यान औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या फुलारी यांच्या समोर मांडल्या. यामध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये गस्त वाढवणे, सुरक्षेच्या दृष्टीने सीसी टीव्ही कँमेरे बसविणे, स्क्रॅप गोळा करणार्‍या महिलांच्या टोळीवर कारवाई करणे, अवैध धंदे बंद करणे, चोरी व लूटमार प्रकार घडू नयेत याकरिता योग्य त्या उपाय योजना करणे, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पोलीस चौकी करिता लागणारा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी येथे वाहतूक नियंत्रण पोलीस नियुक्ती करणे, अतिक्रमण काढणे करिता पोलिस बंदोबस्त मिळणे बाबत अडचणी उद्योजकांनी अडचणी मांडल्या.

यावेळी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षांनी सुनील फुलारी यांचा सत्कार केला. यावेळी संचालक संजय पेंडसे, स्मॅकचे संचालक सचिन पाटील, रणजीत जाधव, निमंत्रित सदस्य पांडुरंग बुधले, उद्योजक चंद्रशेखर डोली, भीमराव खाडे, अजिंक्य तळेकर, अनिल जाधव, संगमेश पाटील, सत्यजित सावंत, रामचंद्र लोहार आदीसह तिन्ही औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT