House fire at Ambaiwada, damage to residential house with rudimentary materials
बांबवडे : पुढारी वृत्तसेवा
अंबाईवाडा ता. शाहूवाडी येथील निनू काळू गावडे आणि बाळू काळू गावडे या बंधूच्या राहत्या घरास शॉर्टसर्किटने बुधवार दुपारी आचानक आग लागली. यामध्ये प्रापंचिक साहित्य, मौल्यवान वस्तू घराच्या आगीत जळून खाक झाल्या. ऐन पावसाळ्यात हे कुटुंब उघड्यावर आले आहे.
सदरच्या दुर्दैवी घटनेत दोन्ही गावडे बंधूचे नुकसान झाले आहे. घरातील धान्य, मौल्यवान वस्तू जळाल्या आहेत, जनावरांचा चारा लाकूड साहित्य यांचे नुकसान झाले आहे. दुपारच्या वेळी गावडे यांच्या घरातील लोक डोंगर कपारीतील शेतीची मशागत करण्यासाटी गेले होते. यावेळी ही आग लागली.
आगीत राहत्या घरासह मौल्यवान साहित्याचे मोठे नुकसान झाल्याने गावडे बंधू यांना मदतीची गरज आहे. आंबाईवाडा हे ठिकाण चांदोली धरण भागातील उखळूच्या जंगल भागात आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. शासनाने आणि स्वयंमसेवी संस्थांनी मदत करावी असे अवाहन तुकाराम झोरे यांनी केले आहे.