कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्रवाशांना भोजन देताना भोसलेवाडीचे तरूण मंडळाचे कार्यकर्ते. Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पुरात अडकलेल्या प्रवाशांना मदत

भोसलेवाडी येथील तरुण मंडळ, शेतकरी यांचा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील निळे-भोसलेवाडी दरम्यान कडवी नदीच्या महापुराचे महामार्गावर पाणी आले होते. या पाण्यात अडकलेल्या वाहनधारकांना व प्रवाशांना भोसलेवाडी तरूण मंडळाने मोफत भोजनाची व्यवस्था करून सामाजिक भान जपले.

पुरात अडकलेल्या प्रवाशांना मोफत भोजनाची व्यवस्था

कोल्हापुर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर-आंबा दरम्यानच्या निळे-भोसलेवाडी येथे दरवर्षी महापूरात रस्त्यावर पाणी येते. त्यामुळे वाहतूकदार प्रवासी यांची येथे मध्येच अडकून राहतात. सुमारे पाच ते सात तास वाहतूक ठप्प होते. यावर्षीही कडवी नदीला महापूर आल्याने महामार्गावर पाणी येऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अडकलेल्या प्रवाशांना निळे येथील युवक शेतकरी बांधव दरवर्षी अन्नदान करतात. याही वर्षी निळे पैकी भोसलेवाडी येथील विठ्ठल भक्त तरुण मंडळ, भोसलेवाडी युवक मंडळ शेतकरी बांधवांनी व महिला मंडळ यांनी मोफत भोजनाची व्यवस्था करुन सामाजिक भान राखले. रस्त्यावर अडकलेल्या प्रवाशांना अन्नदानाची सोय केल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT