Ashadi Ekadashi Wari | वारकर्‍यांसाठी धुळ्यातून होणार फराळाचे वाटप

उडाणे येथून पंढरपूरला 2 टन केळी रवाना; इंद्रायणी तीरावर होणार वाटप
Dhule Udane
पंढरपुरला दोन टन केळींचे वाहन पंढरपुरकडे मार्गस्थ (छाया : यशवंत हरणे)

धुळे : धुळे तालुक्यातील उडाणे येथील ह.भ.प.धर्मराज बागुल यांच्यावतीने पंढरपूर येथे वारकर्‍यांसाठी फराळ म्हणून आषाढी एकादशीच्या दिनी बुधवार (दि.17) रोजी दोन टन केळीचे वाटप करण्यात येणार आहे. अश्‍विनी कुणाल पाटील यांच्या हस्ते पुजा करुन केळी भरलेले वाहन पंढरपूरकडे रवाना करण्यात आले आहे. इंद्रायीणीच्या तीरावर भरलेल्या भक्तांच्या मांदियाळीत केळी वाटप केले जाणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्ताने बुधवार (दि.17) रोजी अखंड महाराष्ट्राचे दैवत पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मीणीचे दर्शन आणि पायी दिंडी ही महाराष्ट्रातील जनतेसाठी धार्मिक पर्वणीच असते. त्या अनुषंगाने पंढरपुर येथे आषाढी एकादशीला लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. दिंडी मार्गावर तसेच पंढरपुर येथे महाराष्ट्रातील असंख्य दानशुर व्यक्ती विविध प्रकारचे दान करीत असतात. अन्नदान, महाप्रसाद, फराळाचे वाटप, आरोग्य सेवा असे विविध उपक्रम राबविले जातात.

त्या पार्श्‍वभूमीवर उडाणे ता. धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.धर्मराज बागुल यांच्यावतीने आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे भाविकांसाठी फराळ म्हणून दोन टन केळीचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी आज केळी भरलेल्या वाहनाची सौ.अश्‍विनीताई कुणाल पाटील यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. त्यानंतर वाहन पंढरपुरकडे मार्गस्थ झाले. यावेळी विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, स्विय सहाय्यक सतिष जोशी, रामकृष्ण पाटील, प्रणव पाटील, उडाणे येथील धर्मराज बागुल,राजू मोरे, नवल पद्मोर, अशोक बागुल, बापू हालोर, मंथन शिंदे, समाधान मासुळे, मच्छिंद्र मासुळे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news