अब्दुल लाट : पुढारी वृत्तसेवा
येथील ग्रामपंचायतीचे काही सदस्य ग्रामपंचायतीच्या पायरीवरचा ठिय्या मांडून ग्रामविकास अधिकारी विजयसिंह रजपूत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ग्रामविकास अधिकारी यांच्या कारभाराबाबत निषेध व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मासिक सभेत ग्रामविकास अधिकारी विजयसिंह रजपूत यांच्या चुकीच्या तसेच गैरकारभाराबाबत धारेवर धरले होते. तसेच मासिक सभेत गैर कारभाराबाबत माहिती मगितली. यामुळे मासिक मिटिंग अर्ध्यावर सोडून ग्रामविकास अधिकारी रजपूत यांनी पळ काढला.
ठरलेल्या वेळेतील मासिक मिटिंग आटोपून मिटींगमध्ये सर्व आलेल्या ग्रामस्थांच्या तक्रारींचे अर्जांची चर्चा करून तक्रारदार ग्रामस्थांच्या जागेवर जाऊया असे सदस्य सांगत असताना देखील सदस्यांना न-जुमानता मिटिंग हॉल मधून ग्रामविकास अधिकारी मधूनच निघून गेले. फोन करून करून देखील मिटींगला न-आल्याने व सदस्यांच्या कोणत्याही विनंतीला न-जुमानल्याने सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चार-साडेचार वाजेपर्यंत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या पायरीवर बसून ठिय्या मांडून घोषणाबाजी व निषेध व्यक्त करण्यात केला.यावेळी शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती विद्याधर कुलकर्णी हेदेखील झालेल्या घटनेबद्दल तीव्र निषेध करत व्यक्त करत ग्रामविकास अधिकारी यांना धारेवर धरले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिजित पाटील, राधिका भाट,जितेश पाटील,सुरेश बेडक्याळे,वर्षा पाटील,क्षमा ठिकणे, वर्षा कदम, आदींसह भाजपचे नेते अरुण पाटील,सामाजिक कार्यकर्ते दीपक वराळे(सर),सतीश कुरणे,धैर्यशील माने गटाचे खंदे कार्यकर्ते भाऊसाहेब कदम व संजय परीट(सर),शामराव कोळी,संजय खुरपे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.