काशिराम गायकवाडः कुडाळ
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन मिळावी अशा प्रमुख मागण्यांसाठी कुडाळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आज मंगळवारी 1 मे कामगार दिनी दिवशी कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन या संघटनेच्यावतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. कुडाळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने यात सहभाग घेत धरणे आंदोलन करत न्याय मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे सादर केले. सभापती राजन जाधव व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संघटनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र बिडये, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चिंदरकर, सचिव कविता परब, सहसचिव दिपक खरूडे, खजिनदार प्रसाद नार्वेकर, सल्लागार हनुमंत चव्हाण, सुहास बांबर्डेकर, संगीता गावडे, इर्जित फर्नांडिस, निवृत्ती सावंत, शंकर शिर्के, गणेश परब, सखाराम परब, शैलेश गावडे, हरि पालव, ज्ञानदेव चव्हाण, दिपक जाधव, शैलेश मयेकर, अरूण तावडे, समीर सावंत आदींसह संघटना पदाधिकारी,सदस्य व ग्रा.पं.कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. ग्रा.पं.कर्मचारी यांच्या न्याय मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक विचार करून मागण्या मान्य करून न्याय मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला.