गुडाळ (कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायत निवडणुका होणाऱ्या राधानगरी तालुक्यात निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यात 66 पैकी आठ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या असून करंजफेण ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड बिनविरोध झाली असली तरी सरपंच पदासाठी निवडणूक लागली आहे. तर 57 ग्रामपंचायती मध्ये पूर्ण निवडणूक होत आहे.
एकूण 211 मतदान केंद्रावर 1055 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 100 कर्मचारी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. गावोगावी ईव्हीएम मशीन आणि कर्मचारी ने – आण करण्यासाठी 28 बसेस आणि वीस जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस आणि गृहरक्षक दलाचा जवान तैनात करण्यात आलेला आहे. तालुक्यातील संवेदनशील गावात जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा :