Gokul Election 2026 PUDHARI
कोल्हापूर

Gokul Election 2026 : पात्र 492 संस्था पुन्हा अपात्र करण्याबाबत याचिका; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष

Anirudha Sankpal

गुडाळ : आशिष ल. पाटील

Gokul Election 2026 Update: गोकुळच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धामधूम सुरू असतानाच अवसायनातून पात्र ठरलेल्या 492 संस्था पुन्हा अपात्र करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी आज बुधवारी होत आहे. या सुनावणी कडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

कोणी दिलं आहे सर्वोच्च न्यायालयात आव्हान?

याबाबत अधिक माहिती अशी, सहाय्यक निबंधक ( दुग्ध) कोल्हापूर यांनी अवसायनात काढलेल्या संस्था पैकी 194 दूध संस्था उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये पात्र ठरल्या होत्या. तर अवसायनातील आणखी 298 दूध संस्था जिल्हा उपनिबंधक (दुग्ध) पुणे यांच्याकडे झालेल्या सुनावणीत पात्र ठरल्या होत्या.

या एकूण 492 संस्थांच्या पात्रतेला इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संस्थेची एस एल पी दाखल करून घेतली असून त्यावर आज बुधवारी सुनावणी होत आहे.

अभिषेक मनू संघवी मांडणार बाजू

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी होणार असून 492 दूध संस्थांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अभिषेक मनू संघवी हे बाजू मांडणार आहेत. तर सरकारच्या वतीने ॲड. धर्माधिकारी बाजू मांडणार आहेत.

गोकुळमध्ये महायुतीत सुरू असलेल्या संघर्षामध्ये या याचिकेमुळे पुन्हा भर पडली आहे. मतदार यादीत समावेश असलेल्या या 492 संस्था कायम राहणार? अपात्र ठरणार की त्यांचे मतदान स्वतंत्र घेणार? याकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT