Homeguard Shahrukh Balaso Shaikh File Photo
कोल्हापूर

Kolhapur homeguard attack: राधानगरीमध्ये विसर्जन मिरवणुकीत राडा! होमगार्डला मारहाण; २६ जणांवर गुन्हा दाखल

राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी दोन मंडळांमध्ये सुरु असलेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या होमगार्डला मारहाण केल्याप्रकरणी २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur homeguard attack

राशिवडे : राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी दोन मंडळांमध्ये सुरु असलेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या होमगार्डला मारहाण केल्याप्रकरणी २६ जणांविरुद्ध राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये होमगार्ड सचिन शंकर पाटील रा.तारळे खुर्द यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, सावर्डे पाटणकर येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरु होती. यावेळी सिध्दीविनायक व शिवगणेश या दोन मंडळांमध्ये मुर्ती पुढे-मागे घेण्यावरून वाद सुरु होता. यावेळी शाहरुख बाळासो शेख व सचिन शंकर पाटील या दोन होमगार्डनी हा वाद मिटविला. परंतु तुम्ही आमच्या वादात पडू नका, म्हणत वाद घालत भिरकवलेला दगड होमगार्ड शेख यांच्या नाकाला लागला, जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सोळांकूर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आदित्य दत्तात्रय कवडे, दत्तात्रय मारुती काशिद, अमर शशिकांत काशिद, किरण धनाजी काशिद, केतन केदार सोनगेकर, रणजीत दिलीप काशिद, अंगज सतीश काशिद, साताप्पा कोंडीबा सोनगेकर, नितीन बळवंत सोनगेकर, साईनाथ मधुकर वरोटे, निखिल नामदेव सोनगेकर, प्रमोद प्रकाश काशिद, स्वप्निल धनाजी वरोटे, प्रतीक बळीराम काशिद, दिपक शशिकांत काशिद, नवनाथ निवृत्ती सुतार, स्वप्निल दिनकर गुरव, सुशांत अरुण पाटील, दत्तात्रय शिवाजी पाटील, अथर्व गोरकनाथ पाटील, निलेश कृष्णात सुतार, संतोष कोंडीबा पाटील, सुरज संभाजी पाटील, ओंकार पांडुरंग पाटील, राहुल शिवाजी पाटील, सतीश शिवाजी काशिद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.नि. अजित सिद करत आहेत.

बाप्पाला निरोप; प्रशासकीय नियमांची ऐशीतैशी

गेले ११ दिवस विघ्नहर्त्या गणरायाची मनोभावे सेवा करणाऱ्या कोल्हापूरकरांच्या भक्तीचा महासागर शुक्रवारी उसळला. या अलोट जनसागराने प्रचंड उत्साहात लाडक्या बाप्पाला भक्‍तिभावे निरोप दिला. मात्र, विसर्जन मिरवणुकीत नियमांची ऐशीतैशी झाली. दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू होता. सायंकाळनंतर रात्री बारापर्यंत नुसता साऊंड सिस्‍टीमचा दणदणाटच सुरू होता.

रंगीबेरंगी आकर्षक लाईटस्‌ इफेक्टस्‌नी उजळलेला महाद्वार रोड व तरुणाईच्‍या जल्लोषात रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक मार्ग चैतन्यदायी वातावरणाने भारून गेला होता. महिलांचाही उदंड सहभाग असलेल्या या विसर्जन मिरवणुकीची २४ तासांनी सांगता झाली. १५ मंडळांच्या साऊंट सिस्‍टीमच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी दहा मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे आढळले. त्यांच्यावर दोन दिवसांत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मिरवणूक मार्गात सायंकाळी सहापासून रात्री बारा वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती. यामुळे अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना चारवेळा सौम्य लाठीमार करावा लागला. काही मंडळांच्या नियमापेक्षा जादा ट्रॉली, साऊंड सिस्‍टीमचे मिक्सर जप्त केले गेले. गणेशमूर्ती पुढे नेण्यावरून मंडळांचे कार्यकर्ते व पोलिसांत वादही झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT