Ichalkaranji Ganesh Visarjan | इचलकरंजीत मधमाश्‍यांच्या हल्ल्याने विसर्जन मिरवणुकीत धावपळ

वृद्धासह तरुण जखमी; अनेकांना डंख
Ichalkaranji Ganesh Visarjan |
इचलकरंजी : मधमाश्यांच्या हल्ल्याने एकच पळापळ उडाली.
Published on: 
Updated on: 

इचलकरंजी : गणेश विसर्जन मिरवणुकीत पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावर अचानक मधमाश्‍यांनी हल्ला केल्याने धावपळ उडाली. वृद्धासह एका तरुणाला मधमाश्‍यांनी डंख मारल्याने ते जखमी झाले तर अनेक नागरिक, मंडळांचे कार्यकर्ते, पोलिस आणि महापालिका कर्मचार्‍यांनाही मधमाश्‍यांनी चावा घेतला.

दुपारच्या सुमारास गणेशमूर्ती घेऊन मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या पुलावरून जात असताना काही ठिकाणी फटाके फोडण्यात येत होते. स्मोक फटाक्यांच्या धुराचे लोट पुलाखाली पोहोचताच अचानक मधमाश्‍या मिरवणुकीच्या दिशेने आल्‍या. काही क्षणातच कार्यकर्ते, नागरिक, वाहनधारक, पोलिस व महापालिका कर्मचार्‍यांवर मधमाश्‍यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. डंखापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी पुलावरून मिळेल त्या दिशेने धाव घेतली. काही वाहनधारकांनी आपली वाहने पुलावरच सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. त्यामुळे पुलावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. जखमी झालेल्या वृद्ध आणि तरुणावर तत्काळ खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अन्य नागरिकांनी प्राथमिक उपचार घेतले. सुमारे १५ ते २० मिनिटांनंतर मधमाश्‍या शांत झाल्‍या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news