illegal gambling File Photo
कोल्हापूर

Illegal Gambling Case | शिनोळी खुर्द येथे हॉटेलच्या टेरेसवर जुगार अड्डा; आठ जणांवर गुन्हा दाखल

सात मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा सुमारे ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Chandgad Illegal Gambling Case

चंदगड : वेंगुर्ला-बेळगाव मार्गावरील शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील सूर्या हॉटेलच्या टेरेसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकला. पत्त्यांच्या पानांवर जुगार खेळताना आठ जण आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून सात मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा सुमारे ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ऋषीराज राजाराम कोरवी यांनी फिर्याद दिली आहे. संतोष नागाप्पा तेरणी (३५, रा. बेनकनहळी, बेळगाव), मोहम्मद रेहमान हनिफ जमादार (८०, रा. उचगाव, ता. बेळगाव), इम्तियाज महम्मद सनदी (५६, रा. अनगोळ गल्ली, उचगाव), मोसीन मेहबुब शेख (२८, रा. उचगाव), नागेश महादेव सुरंगे (३५, रा. शिनोळी बुद्रुक, ता. चंदगड), परशराम निंगाप्पा घोळसे (५३, रा. रामपूर, ता. चंदगड), मोहतेश रुजाई फर्नाडींस (५४, रा. उचगाव, ता. बेळगाव) यांच्यासह एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून सात मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विलास भारती करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT