गुडाळ : खिंडी व्हरवडे ( ता.राधानगरी) येथून आठ ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या महादेव नागू सावंत ( वय ८४ ) या वयोवृद्ध शेतकऱ्याने खिंडी व्हरवडे - आकनूर मार्गावरील खिंडीचा माळ नावाच्या शेतात झाडाला गळफास घेत जीवन संपवलेचे सोमवारी (ता 13) रोजी रात्री निदर्शनास आले. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या बुधवार (ता.८ आक्टोंबर) दुपार पासून श्री. सावंत घरातून बेपत्ता झाले होते. सोमवारी( ता.१३) रात्री ८ च्या सुमारास खिंडीचा माळ शेतामधील शिसमच्या झाडाला काळ्या रंगाच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केलेचे निदर्शनास आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
उत्तरिय तपासणीनंतर रात्री त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे तीन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार श्री.देसाई, पो. हे. काँ. पाटील करत आहेत.