जयसिंगपूर : गुरू शिष्याची भेट झाल्यानंतर पाऊस होणार. राज्यात गोंधळ माजलाय. माझ्या पायास राहिल त्याला फक्त कानाने ऐकायका मिळेल. पण डोळ्याने बघायला मिळणार नाही. मेंढ्यांना सुख समाधानानं ठेवीन, पालखीत मेंढी मिरवलं, ऊसाचं रसभांड तेजीनं विकल, मिरची, तंबाखू दराचा तेजीत होईल. पिकांची भरभराट होईल. मात्र दर तळाला जाईल. देशात सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडतील, त्यामुळे देवाच्या भंडार्यात कोण राहील त्याला सुखसमाधान मिळेल, अशी भाकणूक खोलोबा वाघमोडे फरांडे महाराज यांनी भाकणूक केली.
श्री खोलोबा देवस्थान श्री क्षेत्र अंजनगाव (खे) (ता.माढा, जि.सोलापूर) येथील खोलोबा वाघमोडे फरांडे महाराज यांची पट्टणकोडोलीकडे येणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याच्या नवव्या दिवशी सोमवारी उदगांव (ता.शिरोळ) येथील श्री महादेवी मंदिराच्या पटांगणात भाकणूक केली.
यावेळी उदगांव ग्रामपंचायतीच्यावतीने पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने शिधा देण्यात आला. यावेळी सरपंच सलीम पेंढारी, उपसरपंच अरूण कोळी, अॅड.स्वरूप शिंदे, योगेश घाटगे, संभाजी शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी महादेवी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.