Fake Notes Racket Kolhapur
जयसिंगपूर : उदगाव (ता.शिरोळ) येथे बनावट नोटांचे रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बुधवारी (दि.२९) मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोट्यामध्ये पोलिसांनी 68 हजार 400 रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. या रॅकेट मधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बनावट नोटा प्रकरणाची पोलिसांना पुढील माहिती मिळाल्यानंतर इचलकरंजी व दानोळी येथील तरुण यामध्ये सामील असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस इचलकरंजी येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर व इतर साहित्य हस्तगत केले आहे.
जयसिंगपूर उपविभागीय पोलीस तसेच जयसिंगपूर पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या तरुणांच्याकडून बनावट नोटा प्रकरणी चौकशी सुरू असून या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. शिरोळ तालुक्यामध्ये खुनाचे सत्र सुरू असतानाच आता नव्याने बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आल्याने शिरोळ तालुक्यातसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.